महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात 'ओ फौजी तुझे सलाम' या देशभक्तीपर गीताचे लॉंचिंग - गीताच्या दिग्दर्शन

सैन्य दलाविषयी बंधुभाव आणि देशभक्ती वाढीस लावण्यासाठी सोलापुरातील गौरी फिल्म्सच्या क्रू मेंबर्सनी सलग एक महिना परिश्रम घेत देशभक्तीपर गीताची निर्मीती केली आहे. 'ओ फौजी तुझे सलाम' असे या गीताचे नाव आहे.

'ओ फौजी तुझे सलाम'

By

Published : Aug 13, 2019, 7:34 PM IST

सोलापूर- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील हौशी कलावंतांनी 'ओ फौजी तुझे सलाम' या देशभक्तीपर गीताची निर्मिती केली आहे. या गीताचे मंगळवारी पत्रकारपरिषदेत लाँचिंग करण्यात आले. हे गीत लोकांपर्यंत पोहचविणे तसेच त्या माध्यमातून सैन्य दलाविषयी बंधुभाव आणि देशभक्ती वाढीस लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे, निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

'ओ फौजी तुझे सलाम' या देशभक्तीपर गीताचे लॉंचिंग

ओ फौजी तुझे सलाम या गीताचे लेखन गुरुनाथ औरंगे यांनी केले आहे. तर संगीत जब्बार आणि धनंजय यांनी दिल आहे. तसेच निर्माते बाबू औरंगे यांनी श्रीकांत समारंभ यांच्यावर गीताच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. गीताच्या निर्मितीसाठी गौरी फिल्म्सच्या क्रू मेंबर्सनी सलग एक महिना परिश्रम घेतले आहेत.

सोशल मिडियावर सोलापुरात निर्मिती झालेल्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 ऑगस्टला देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्यासाठी या गाण्याचा चांगला उपयोग होईल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details