सोलापूर - आषाढी वारीच्या काळात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व नामदेव पायरीजवळ नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळाच्या सालीमुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नारळ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास मनाई, अनुचित घटना घडू नये म्हणून मंदिर समितीचा निर्णय - aashadhi wari
आषाढी वारीच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व नामदेव पायरीजवळ नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळाच्या सालीमुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नारळ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूर शहरात आषाढी वारीनिमित्त पुढील १५ दिवस लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. १७ जुलै २०१९ पर्यंत आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने चिखल होण्याची शक्यता आहे. नारळाच्या सालीमुळे त्या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास बंदी घातली आहे. हे आदेश ३ जुलै २०१९ ला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते दिनांक १७ जुलै २०१९ ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ढोले यांनी आदेशात सांगितले आहे.