पुणे: महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या आषाढी वारीची जून महिन्यात 10 तारखेला प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी वारी मार्गावरील कामाचा आणि वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये. सर्व सुख-सुविधा भेटाव्यात आणि त्याच्या मागणीची आढावा बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. ही आढावा बैठक पुणे विभागीय कार्यालयात घेण्यात आली. ज्या-ज्या मार्गातून वारी जाते,त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधिकारी, हे या बैठकीला उपस्थितीत होते. वारकऱ्यांना पालखी मार्ग तयार झाल्याने टोल द्यावा लागणार आहे. तो टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोणत्या विषयावर झाली चर्चा :यावर्षीची आषाढी वारी जून महिन्यात 10 तारखेला प्रस्थान करणार असून 29 जूनला ती पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे या सगळ्या पालखी मार्गावरचा आढावा आज पालकमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्या बैठकीला आळंदी संस्थांचे प्रमुख विकास ढगे देहू संस्थांचे माणिक मोरे यांच्यासह विविध पालकाचे प्रमुख दिंडी प्रमुख यांची उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत वारीच्या संदर्भात वारकऱ्यांच्या काय मागण्या आहेत. काय अडचणी आहेत. या सगळ्या जाणून घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून कुठल्या प्रकारे तयारी करण्यात आली, याचा सुद्धा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. यामध्ये दिंडी प्रमुख, वारी प्रमुख, तसेच वारकऱ्यांचे नेते, आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती. झालेल्या नियोजनाची माहिती बैठकीत देण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.
हे आदेश देण्यात आले :तिन्ही जिल्ह्यातले जिल्हा अधिकारी, नेते वारकरी यांची बैठकीला उपस्थिती होते. वारकरी प्रमुख लोकांची समाधान बैठक झाली आहे. बैठकीत काही भविष्यातील विषय आले आहेत. त्यासाठी दोन समित्या केल्या आहेत. त्यांचा WhatsApp ग्रुप आणि आठवड्याला बैठका घेतील. रस्ता झाल्याने पालखी मार्गातील झाडे तोडण्यात आली आहेत. या मार्गावर वृक्षांची लागवड केली जाईल. परंतु त्यांची वाढ होण्यास वेळ लागेल. दोन मुक्कामाच्या मध्ये मंडप उभारण्यात येतील. टॉयलेट्सची सोय करण्यात येणार आहे. मुक्कामाचे जागा लहान झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दोन दिवस वारकरी देत येत असतात. त्यासाठी देहू गायरान सगळे वापरतील. तसे आदेश देण्यात आले आहे.
नवीन पालखी रस्ते महामार्ग तयार झाल्याने त्या ठिकाणी टोल घेतला जाणार आहे. वारकऱ्यांकडून हा टोल घेऊ नये, यासाठी आपण नितीन गडकरी यांना विनंती करणार आहे. त्यांची विनंती मान्य झाली तर टोल वसुली सुरू असली तरी वारकऱ्यांकडून टोल नसणार. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री