सोलापूर - 'नो मास्क, नो एन्ट्री आणि नो सर्व्हिस' हा नवा उपक्रम सोलापूर बाजारपेठ संघटना आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी माध्यमांना बोलताना दिली.
मास्क नसेल तर नो एन्ट्री, नो सर्व्हिस..! सोलापूरच्या बाजारपेठेत कोरोना रोखण्यासाठी उपक्रम - सोलापूर महानगरपालिका
'नो मास्क, नो एन्ट्री आणि नो सर्व्हिस' हा नवा उपक्रम सोलापूर बाजारपेठ संघटना आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये व त्यांच्या मृत्युमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापुढे कोव्हिड-१९ नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे. यासाठी राज्यभर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व व्यापारी पेठांमध्ये "मास्क नाही, तर प्रवेश नाही" (No Mask, No Entry, No Sevice) असे कोरोना संसर्ग टाळण्याकरिता आवाहन करणारे जनजागृती स्टिकर्स तयार करून शहरातील सर्व दुकानांमध्ये लावण्यात आले आहे. तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंपाच्या ठिकाणी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे बॅनर लावण्याचे शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सचिव धवल शहा, खजिनदार राजगोपाल झंवर, निलेश पटेल, सुकुमार चंकेश्वरा, संजय कंदले, शैलेश बचुवार, चेतन बाफना, इंदरलाल होतवाणी, रामशेठ पंजवाणी, दयासागर सालुटगी, राजू नाशिककर, महेन्द्र कटारिया, विकी ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.