महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई प्रमाणे नवे सोलापूर स्थापन करणार -नरसय्या आडम

पंतप्रधान आवास योजना अभियाना अंतर्गत जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव प्रकल्प सोलापुरात उभारले जात आहेत. यामध्ये 30 हजार असंघटीत कामगारांना हक्काचे घर मिळणार आहे. आज रविवारी 1 ऑगस्ट रोजी 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले.

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात  रविवारी 1 ऑगस्ट रोजी 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले.
सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात रविवारी 1 ऑगस्ट रोजी 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले.

By

Published : Aug 1, 2021, 9:17 PM IST

सोलापूर - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगरच्या कुंभारी माळरानावर नवी मुंबईच्या धर्तीवर रे नगर हे नवे सोलापूर उभारणार, असा आशावाद माजी आमदार आणि माकपचे नेते नरसय्या आडम यांनी व्यक्त केला आहे. ते सोलापूरमध्ये 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले, त्यावेळी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सोलापूरचे खासदार खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी उपस्थित होते.

आज रविवारी 1 ऑगस्ट रोजी 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार नरसय्या आडम आणि सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

'9 ऑगस्ट रोजी कामगारांना घेऊन महाधरणे करणार'

रे नगरमध्ये 30 हजार असंघटीत कामगाराचे घरे उभारणार आहेत. हे प्रकल्प म्हणजे सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी बाब आहे. परंतु, महापालिका आयुक्तांनी हरकत घेतली असून, ही योग्य बाब नसल्याची खंत माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, कामगारांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. याविरोधात 9 ऑगस्ट रोजी तीस हजार असंघटीत कामगारांना घेऊन महाधरणे करणार असल्याचा इशाराही आडम यांनी यावेळी दिला आहे.

'जगातील अभिनव असे 30 हजार हजार घरांचे प्रकल्प'

पंतप्रधान आवास योजना अभियाना अंतर्गत जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव प्रकल्प सोलापुरात उभारले जात आहेत. यामध्ये 30 हजार असंघटीत कामगारांना हक्काचे घर मिळणार आहे. आज रविवारी 1 ऑगस्ट रोजी 10 हजार कामगारांना घरांची लॉटरी पद्धतीने सोडत करून, घरे वितरित करण्यात आले. 9 ऑगस्ट रोजी बाकीच्या 20 हजार कामगारांना लॉटरी पद्धतीने घरे हस्तांतरीत केली जाणार आहेत.

'पालिका आयुक्तांबद्दल खंत व्यक्त केली'

माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यसपीठावर बोलताना, सोलापूर महानगरपालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली. कुंभारी गावाच्या हद्दीत साकारले जाणारे रे'नगर या प्रकल्पावर महानगरपालिका आयुक्तांनी प्रशासकीय हरकत घेतली आहे. ही हरकत मागे न घेतल्यास 30 हजार कामगारांना घेऊन, महानगरपालिके समोर महाधरणे केले जाणार आहे अस अ़डम म्हणाले आहेत.

'सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत कौतूक केले'

आडम यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. रे नगर येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून त्यांनी प्रयत्न केले. पण महानगरपालिका आयुक्तांनी उलट हरकत घेत काम थांबविन्याचा प्रयत्न केला. 9 ऑगस्टपर्यंत महापालिका आयुक्तांची आडकाठी हटवली नाही, तर 30 हजार कामगार सोबत घेत सोलापूर पालिकेला घेराव घालून महाधरणे करणात येणार असल्याचा इशारा आडम यांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details