सोलापूर - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 822 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 72 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 321 जण कोरोनामधून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सोलापुरात कोरोनाचा आकडा 822 वर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू - solapur corona updates
आज (शुक्रवारी) सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 74 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 60 पुरूष आणि 14 स्त्रियांचा समावेश आहे. तर, जिल्ह्याचा आकडा ८२२ वर जाऊन पोहोचला आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 74 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 60 पुरुष आणि 14 स्त्रियांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 6 हजार 594 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 हजार 772 जणांचे अहवाल हे कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 822 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे.
सोलापूरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा 12 एप्रिलला आढळला होता. यानंतर, दीड महिन्यात हा आकडा 822 वर गेला आहे. तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाने आता ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस नव्याने रुग्ण आढळून येत आहे. तर, ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू झाल्यामुळे या पुढील काळात नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.