Sharad Pawar News: जनतेला विश्वास वाटेल, असा पर्याय देण्याची गरज- शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका - criticized PM Modi
सोलापूर शहरातील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे शरद पवार यांनी सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी बिहारचे नितीश कुमार यांच्यासोबत 11 तारखेला बैठक होणार आहे, अशी माहिती दिली. देशाला विश्वास वाटेल असा पर्याय देण्याची गरज आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
शरद पवार
By
Published : May 8, 2023, 10:59 AM IST
बिहारचे नितीश कुमार यांच्यासोबत 11 तारखेला बैठक होणार - शरद पवार
सोलापूर :बिहारचे नितीश कुमार हे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत बैठक होणार आहे. पण या देशाला पर्याय देण्याची गरज आहे. लोकांचा विश्वास बसेल, असा पर्याय देऊ असेही शरद पवार यांनी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. त्याचे पार्सल महाराष्टात पाठवा, आम्ही बघू अशी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी कोण किती जिल्ह्याचा पक्ष आहे, पार्सल कुठे पाठवायचे आहे ते निपाणीत सांगतो, असे सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचा दौरा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर होते. पंढरपूर, सांगोला येथील दौरे आटोपून शरद पवार रविवारी रात्री सोलापुरातील एका लग्न सोहळा कार्यक्रमात आले होते. सोलापूर येथून निपाणी आणि सातारा येथे जाणार आहेत. राजीनामा प्रकरणानंतर शरद पवार यांनी पहिलाच दौरा सोलापूर जिल्ह्याचा केला. कामाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातुन करतो, अशी माहिती दिली.
शरद पवारांची सावध भूमिका :सोलापूर लोकसभेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मागत आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापुरात राष्ट्रवादीविरुद्ध काँग्रेस असेही चित्र निर्माण झाले होते. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र बसतो, चर्चा करतो आताच जागा मागणीची चर्चा करणे योग्य नाही, त्यामुळे ही चर्चा नको असे म्हणून त्यांनी या मागणीला पूर्णविराम दिला. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सध्या काय चालले आहे, या प्रश्नावर त्यांनी काही काळजी करू नका सर्व ठीक आहे, असे हसत उत्तर दिले.
'या' दोन जिल्ह्यांचा आवर्जून उल्लेख :राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन जिल्ह्यांचा उल्लेख केला. काम करताना मी दोन ठिकाणांची निवड करतो. पहिले कोल्हापूर आणि दुसरे सोलापूर. सोलापुरातुन कामाची सुरुवात करण्याचा निर्णय घेत मी सोलापुरात आलो, अशी शरद पवार यांनी माहिती दिली. या दोन शहरातील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. ऊर्जा देणारे शहर आहे, म्हणून मी आलो. कामाची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याचे चित्र कसे बदलता येईल, याची सुरुवात सोलापुरातुन मी केली आहे असे शरद पवारांनी सांगितले.