सोलापूर- राष्ट्रवादीचे माढ्यातील आमदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांचे बधू बबनराव शिंदे यांनी आज सहपत्नी निमगावमध्ये मतदान केले. यावेळी त्यांनी संजय शिंदे हे प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
माढा लोकसभा : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंनी सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क - ncp
निवडणुकीत प्रचार शेतीचे प्रश्न, ग्रामीण विकास, दलितांच्या समस्या यावर आधारीत होणे गरजेचे होते. मात्र, तो वैयक्तिक पातळीवर केला गेला. त्यामुळे या निवडणुकीत प्रचाराची पातळी खालावली असल्याचे, स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बबनदादा शिंदे - आमदार -राष्ट्रवादी
या निवडणुकीच्या प्रचारात शेतीचे प्रश्न, ग्रामीण विकास, दलितांच्या समस्यांवर आधारीत मुद्दे विचारात घेणे गरजेचे होते. मात्र, तो वैयक्तिक पातळीवर केला गेला. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराची पातळी खालावली असल्याचे, स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.