सोलापूर -बीटेकच्या प्रवेशाचे शुल्क भरणे शक्य न झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या रुपाली पवारच्या कुटुंबीयांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. पैसे नसल्याने विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागणे ही राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचे अजित पवार यांनी मत व्यक्त केले. अजित पवार यांनी शुक्रवारी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, पवार कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
रुपालीची आत्महत्या राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट - अजित पवार - ncp leader ajit pawar
मोहोळ तालुक्यातील देगाव येथील रुपाली पवार या विद्यार्थिनीने प्रवेश शुल्क भरण्यासाठी नसल्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या रुपाली पवार यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अजित पवार हे देगाव या गावी गेले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार हे सोलापुरात आले होते. मुलाखती संपल्यावर पवारांनी ही भेट घेतली. यावेळी माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी रुपाली पवारच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.