महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याचा मुस्लिम महिलांकडून निषेध, कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखा बंदी करावी, असे लेखन केले होते. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये खासदार संजय राऊता यांच्याविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे.

मुस्लिम महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

By

Published : May 4, 2019, 11:27 AM IST

सोलापूर - बुरखा बंदीसंदर्भात वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली बुरखाधारी मुस्लिम महिलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

बुरखा परिधान करणे हा संवैधानिक अधिकार असल्याचा महिला म्हणाल्या


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखा बंदी करावी, असे लेखन केले होते. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये खासदार संजय राऊता यांच्याविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. राऊत यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज सोलापूर शहर युवक काँग्रेस पार्टीने बुरखाधारी महिलांसह जिल्हाधिकाऱयांना लेखी निवेदन दिले.


राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी संबंध मुस्लिम महिला आणि समाजाची माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटांनंतर राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळं शिवसेनेतल्या कडव्या हिंदुत्वाचा चेहरा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details