महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन ; शरद पवारांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध - sharad pawar news

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले आहे.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

By

Published : Sep 25, 2019, 1:17 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले आहे.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूडापोटी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून सरकारचा निषेध केला.

हेही वाचा पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार

हे मूक आंदोलन सुरू असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

ABOUT THE AUTHOR

...view details