सोलापूर - मी मागास असल्यानेच काँग्रेस मला शिव्या देते. मागास असल्यानेच माझ्यासमोर अडचणी आणल्या जातात. ते पूर्ण मागास समाजाला शिव्या देत आहेत. दलित, शोषित, आदीवासींना चोर म्हणल्यास देश सहन करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
मी मागास असल्यानेच काँग्रेस मला शिव्या देते - नरेंद्र मोदी - criticise
दलित, शोषित, आदीवासींना चोर म्हणल्यास देश सहन करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
अकलूज येथील सभेत बोलताना नरेंद्र मोदी
माढा मतदारसंघातील अकलूजमध्ये आयोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. मी मागास असल्याने अनेकदा काँग्रेसने माझ्यावर टीका केली. ते सर्व मागास समाजाला चोर बोलू लागले आहेत, असे मोदी म्हणाले. यापूर्वी त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ केली होती. आता ज्यांचे आडनाव मोदी आहे, त्यांनाही ते चोर म्हणत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.