महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकून घ्यावी; 'या' खासदाराने व्यक्त केली अपेक्षा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कन्नड भाषिक असलेल्या कुडल संगम गावातील तीर्थक्षेत्र असलेल्या संगमेश्वर देवस्थान येथे विकास कामांचे भूमिपूजन सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांनी हे वक्तव्य केले.

By

Published : Jun 1, 2019, 8:01 PM IST

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर- सोलापुरातील अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्यावी, अशी अपेक्षा सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कुडल संगम येथील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. कन्नड बहुल असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त भाषणही कन्नड मधून होत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी कन्नड शिकून घ्यावी असे खासदारांनी म्हटलं आहे.

कुडल संगम हे गाव कन्नड भाषिक असल्याने जयसिद्धेश्वर हे कन्नड मधून भाषण करत होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भाषण समजावे यासाठी भाषण मराठीतून करा, अशी विनंती व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने खासदारांना केली. त्यावेळी कन्नड भाषिक असलेल्या गावातील व्यासपीठावरील इतर कार्यकर्त्यांनी मात्र महास्वामी यांनी त्यांचे भाषण हे कन्नड मधूनच करावे, असा आग्रह धरला.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे कन्नड मधून भाषण करत होते. यावेळी यावेळी व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने मराठीतून भाषण करण्याची विनंती केली. यावर अधिकाऱ्यांनी थोडी तरी कन्नड शिकावी अशी अपेक्षा महास्वामींनी व्यक्त केली.

जय सिद्धेश्वर महास्वामी यांची मातृभाषा जरी कन्नड असली तरी त्यांचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीनही भाषेवर प्रभुत्व आहे. मात्र, व्यासपीठावरील व व्यासपीठा समोरील सर्वजण कन्नड भाषिक असल्यामुळेच महा स्वामींनी कन्नड मधूनच भाषण सुरू ठेवत यापुढे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील काही गावे ही पूर्णपणे कन्नड भाषिक आहेत. या तालुक्यातील गावांमध्ये ते शंभर टक्के लोकांची मातृभाषा ही कन्नड आहे. त्यामुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूरसह सोलापूर शहरातील तीस टक्के भागात कन्नड भाषा सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी कन्नड भाषाच वापरली जाते.

लिंगायत बहुल असलेल्या भागांमध्ये कन्नड मातृभाषा असून व्यवहारातही कन्नड भाषा वापरली जाते. कन्नड भाषिक मतदारांमुळेच डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात सोलापूरच्या खासदारांना कन्नड भाषेतूनच संवाद साधणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळेच कन्नडसह हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषेवर प्रभुत्व असतानादेखील नवीन खासदारांनी अधिकाऱ्यांनाच थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्या, असा सल्ला दिला आहे. त्यांचा हा सल्ला व्यावहारिक आणि राजकीय या दोन्ही दृष्टीकोनातून असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details