सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (दि. 19 मे) एकूण 1 हजार 812 रुग्ण बरे झाले तर 2 हजार 158 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आज (बुधवारी) जिल्ह्यात 31 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात 18 हजार 2 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण अहवाल
सोलापूर ग्रामीण भागात आरोग्य प्रशासनाने 8 हजार 688 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 2 हजार 99 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्यांमध्ये 1 हजार243 पुरुष आणि 856 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी 1 हजार 774 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागातील 23 जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 13 पुरुष व 10 स्त्रियांचा समावेश आहे. 17 हजार 4 सक्रिय रुग्ण ग्रामीण भागात आहेत.