महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात निवडणुकीच्या तोंडावर लाखोंची रक्कम जप्त

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्याने सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास 11 लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. यामुळे मतदारसंघामध्ये खळबळ उडाली आहे.

Pandharpur
पंढरपूर

By

Published : Mar 18, 2021, 9:47 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास 11 लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. यामुळे मतदारसंघामध्ये खळबळ उडाली आहे.

चेक पोस्टवरुन रोकड जप्त

सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे प्रशासनाकडून भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील चेक पोस्टवर
नायब तहसीलदार कोळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून. 11 लाख 17 हजार रुपये रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. सदरील व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

रक्कमबाबत चौकशी सुरू

भटुंबरे चेक पोस्टवर पुणे येथील एका व्यापाऱ्याच्या वाहनातून 11 लाख 17 हजार रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. त्यामुळे या संबंधित व्यक्तीकडे आयोगाकडून तपासणी व चौकशी सुरू आहे. ही रक्कम कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार होती. याची चौकशी निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन करत आहेत.

हेही वाचा -माढ्याच्या माजी आमदाराकडून रुढीला छेद; वृक्षारोपणाने केले पत्नीच्या अस्थीचे विसर्जन

हेही वाचा -पंढरपूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीचे वारे; 'ही' आहेत इच्छुक उमेदवारांची नावे

ABOUT THE AUTHOR

...view details