सोलापूर- सांगा कसं करायचं, असच सहन करत रहायचं की पेटून उठायचं, हे आवाहन केले आहे राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजीतसिंह यांनी. आपल्या समर्थकांना त्यांनी आज चर्चेसाठी बोलावले आहे. रणजीतसिंह मोहिते भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप देखील त्यांना उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
सहन करायचं की पेटून उठायचं; रणजीतसिंह मोहिते पाटलांचे समर्थकांना आवाहन, भाजप प्रवेशाची चर्चा - भाजप
मोहिते पाटलांच्या अकलूज येथील बंगल्यावर आज बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोहिते पाटलांच्या अकलूज येथील बंगल्यावर आज बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. रणजीतसिंह मोहिते यांनी यासंबंधी सोशल मीडियावरून समर्थकांना आवाहन केले आहे. त्यात ते म्हणतात, 'सांगा कसं करायचं. असच सहन करत रहायचं की पेटून उठायचं. आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी, आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी.' यातून राष्ट्रवादीवरची त्यांची नाराजी त्यांनी दाखवली आहे.
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यातील युतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आजच्या बैठकीनंतर मोहिते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मोहिते पाटलांनी भाजप प्रवेश केला, तर सोलापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे आहे. दुपारी ३ वाजता मोहिते पाटील त्यांचा निर्णय कळवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.