सोलापूर -जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाणी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. यावरून जिल्ह्यातील शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील भाजप खासदार व आमदारांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यातच आता शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवारांची सत्ता आल्यानंतर उजनीचे पाणी बारामतीला जाते, त्यापेक्षा पवारांनी धरणच बारामतीला न्यावे, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.
उजनी पाणी बचाव समिती आक्रमक
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत उजनीतील पाच टीएमसी पाणी देण्याची मान्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व भारतीय जनता पक्ष आक्रमक होत तीव्र आंदोलने केली आहेत. यातूनच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून माऊली फळांवर व दीपक भोसले यांनी जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जागर आंदोलन करत आहे. त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या घरासमोर समितीच्यावतीने हलगीनाद आंदोलन केले.
शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास पाहिला