सोलापूर- सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आहेत. कोरोनाविरूध्दची ही लढाई आपण सर्वांनी एकत्र येऊन लढायची आहे. या लढाईत आपलाही सहभाग असावा हा उद्देश मनात ठेऊन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे यांनी आपले एक महिन्याचे वेतन 2 लाख 11 हजार 863 रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.
आमदार संजय शिंदेंनी एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे यांनी आपला एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.
आमदार शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत आपण दक्ष आहोत. तहसिलदार, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याशी आपण सातत्याने संपर्क ठेऊन आहोत. कोरोना विषयी लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर असतानाही मास्कचा वापर करावा, हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनीही आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा -कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'प्रीसिजन'कडून एक कोटी