महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगोल्यात नीरा उजवा कालव्याचे विभागीय कार्यालय सुरू करणार - आमदार मोहिते-पाटील - माजी आमदार गणपतराव देशमुख

विधानपरिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्याला भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Ranjit Singh Mohite-Patil
रणजितसिंह मोहिते-पाटील

By

Published : Jun 10, 2020, 9:21 PM IST

सांगोला (सोलापूर) - टेंभू, म्हैसाळ व निरा उजवा कालवा या सिंचन योजनेतून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे पाण्याने भरून द्यावेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी सांगोल्यात नीरा उजवा कालव्याचे विभागीय कार्यालय करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले.

विधानपरिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्याला भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महूद येथील जितेंद्र बाजारे यांच्या भक्ती गारमेंटला भेट देऊन पीपीई किट निर्मितीची पाहणी केली. माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

त्यानंतर हॉटेल ज्योतिर्लिंग येथे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील सर्व शेती सिंचनाखाली येण्यासाठी टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून मिळावेत, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या व इतर समस्या सोडविण्यासाठी निरा उजवा कालव्याचे विभागीय कार्यालय सांगोल्यात स्थापन करावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार मोहिते-पाटील यांनी दिले.

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, नगरसेवक प्रशांत धनवजीर, श्रीकांत देशमुख, आनंद फाटे, नवनाथ पवार, अभिजीत नलवडे, विष्णुपंत केदार, डॉ .विजय बाबर, डॉ.जयंत केदार, शिवाजी घेरडे, साहेबराव पाटील, धनंजय चव्हाण, नागेश जोशी, अभिषेक कांबळे, महेश नलवडे, पुण्यवंत खटकाळे, सुरेश चौगुले, परमेश्वर साळुंखे, गणेश कदम, दादा जाधव, सूर्यकांत खटकाळे, संजय केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details