महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर आम्ही रान पेटवू, आमदार प्रणिती शिंदे यांचा पालकमत्र्यांना इशारा - MLA Praniti Shinde warns Guardian Minister

माढा तालुक्यातील उजनी धरण ( Ujani Dam ) हे मुख्यत्वे सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी निर्माण केले आहे. पण, मागील अनेक वर्षांपासून इंदापूर आणि बारामतीसाठी हे पाणी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातून हा वाद सुरूच होता. मात्र, लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच हा वाद आता उघडपणे बाहेर आला आहे. सोलापूरकरांनी थेट इंदापूर, बारामतीकरांविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आज (दि. 18 मे) सोलापूर महानगरपालिकेत आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ) यांनीही उजनी पाण्याच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला आहे.

आमदार प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदे

By

Published : May 18, 2022, 7:48 PM IST

Updated : May 18, 2022, 8:32 PM IST

सोलापूर- सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही राज्यात रान पेटवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharane ) यांचे नाव घेता दिला आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांसोबत आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ) यांनी वाढीव कराबाबत बैठक घेतली. त्यांनतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

बोलताना आमदार प्रणिती शिंदे

सोलापूरचे उजनी धरण ( Ujani Dam ) आता पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सोलापूरकरांचा विरोध डावलून या धरणाचे पाणी इंदापूर व बारामती तालुक्यास नेण्याची तयारी झाली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या बांधावर पाण्याचा वाद रंगू लागला आहे. आता हा वाद चिघळत असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही पालकमत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

उजनी धरण हे मुख्यत्वे सोलापूरसाठी -माढा तालुक्यातील उजनी धरण ( Ujani Dam ) हे मुख्यत्वे सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी निर्माण केले आहे. पण, मागील अनेक वर्षांपासून इंदापूर आणि बारामतीसाठी हे पाणी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातून हा वाद सुरूच होता. मात्र, लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच हा वाद आता उघडपणे बाहेर आला आहे. सोलापूरकरांनी थेट इंदापूर, बारामतीकरांविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आज सोलापूर महानगरपालिकेत आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ) यांनीही उजनी पाण्याच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे ठरताहेत खलनायक -सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharane ) यांनीच उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्याच्या 348 कोटी रूपये खर्चाच्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. सोलापूरच्या हक्काचे पाणी इतर जिल्ह्यात जात असल्याने सोलापूरकरांसाठी पालकमंत्री भरणे हे खलनायक ठरत आहेत. या प्रश्नावर सर्वपक्षीय नेते लोकप्रतिनिधी व नेते मंडळी एकवटून आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा -Ujani Dam Water : उजनीच्या पाण्याचा वाद पेटला; अजित पवार व दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सर्वपक्षीय सिद्धेश्वर चरणी महाआरती

Last Updated : May 18, 2022, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details