महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MIM On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचा पाय कापणाऱ्यास दोन लाख; एमआयएम नेत्याकडून बक्षीस जाहीर - संभाजी भिडेंवर सडकून टीका

सोलापूरात एमआयएम कडून संभाजी भिडें विरोधात निदर्शने करण्यात आली. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा पाय कापणाऱ्याला दोन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

MIM On Sambhaji Bhide
संभाजी भिडेंचा पाय कापणाऱ्यास दोन लाख

By

Published : Aug 1, 2023, 10:24 PM IST

Updated : Aug 1, 2023, 10:29 PM IST

माहिती देताना मोहसीन मैनदर्गीकर

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महात्मा गांधीजीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून एमआयएम नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी एमआयएमचे युवक अध्यक्ष मोहसीन मैनदर्गीकर यांनी संभाजी भिडेंवर सडकून टीका करत, खुले आवाहन दिले आहे. संभाजी भिडेंचा पाय तोडून आणणाऱ्यास दोन लाख रुपये बक्षीस देऊ असे एमआयएम युवक अध्यक्षकांने केलेल्या वक्तव्यामुळे, संभाजी भिडें समर्थक व एमआयएममध्ये राज्यभर वादळ उठणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

संभाजी भिडेंची सुरक्षा काढून टाका: शिवप्रतिष्ठान समर्थकांत किंवा संभाजी भिडे समर्थक यांच्यात तीव्र संताप व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयएममध्ये नुकतेच प्रवेश केलेले आंबेडकरी चळवळीतील नेते मच्छिन्द्र लोकेकर यांनी देखील महाराष्ट्र सरकारला खुले आवाहन केले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात देखील अनेक आंबेडकरी नेत्यांना अटक केली आहे. त्यात संभाजी भिडेंचे नाव आले होते, मात्र ते बाहेर आहेत आणि आंबेडकरी नेते अटक आहेत. महाराष्ट्र सरकारने संभाजी भिडेंची सुरक्षा काढावी. महाराष्ट्र राज्यात संभाजी भिडेंना बंदी घालावी, भाजपने संभाजी भिडेंना पाठिशी घालू नये अशी मागणी केली आहे.




महात्मा गांधीचा दुग्धाभिषेक केला : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडें यांचा निषेध करण्यासाठी एमआयएम नेत्यांनी जोरदार निदर्शने केली. मंगळवारी सायंकाळी एमआयएमच्या नेत्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महात्मा गांधीजीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. यावेळी एमआयएमचे युवक अध्यक्ष मोहसीन मैनदर्गीकर, कोमारु सय्यद, मच्छिन्द्र लोकेकर, इसामोद्दीन पिरजादे, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी,अनिसा डोका, वाहिदा भांडाले, नासीमा कुरेशी, अशापक बागवान, पालेखान पठाण आदी उपस्थित होते. तसेच महिला नेत्या सलमा सय्यद यांनी देखील महात्मा गांधीच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करून अभिवादन केले.

संभाजी भिडेंना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या : एमआयएम मधील आंबेडकरी विचारसरणीचे नेते मच्छिन्द्र लोकेकर यांनी संभाजी भिडेंवर सडकून टीका केली आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडेंचा डीएनए टेस्ट करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य सरकार मधील देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, भाजपचा आणि संभाजी भिडेंचा काहीही संबंध नाही. तर मग संभाजी भिडेंना संरक्षण कशाला देता. ते संरक्षण काढून टाका भिडेंच्या भाषणावर बंदी घाला. भीमा कोरेगाव प्रकरणात देखील अनेक नेते आजही कारागृहात आहेत. त्यात संभाजी भिडेंच नाव आले होते. संभाजी भिडेंना पाच मिनिटं आमच्या ताब्यात द्या असे खुले आवाहन, एमआयएम नेते मच्छिन्द्र लोकेकर यांनी केले आहे.



हेही वाचा -

  1. MIM On Sambhaji Bhide : महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; एमआयएमने केला संभाजी भिडेंचा निषेध
  2. Ajit pawar group protest : राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन; अजित पवार यांच्याकडे करणार लेखी मागणी
  3. Samata Parishad On Sambhaji Bhide: संभाजी भिडेंची मिशी कापून आणणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस; समता परिषदेची जालन्यात घोषणा
Last Updated : Aug 1, 2023, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details