सोलापूर- अकोला लोकसभेच्या जागेसाठी हिदायत पटेलला उमेदवारी देण्यासाठी आपला विरोध होता. मात्र, काँग्रेसने हिदायत यांना उमेदवारी देऊन मला आव्हान दिले आहे. त्यामुळे मी अकोल्याची जागा लढवणारच आहे. तसेच मी अमेठी आणि रायबरेलीतही लक्ष घालू शकतो, असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी अमेठी आणि रायबरेलीतही लक्ष घालू शकतो : आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा
अकोला लोकसभेच्या जागेसाठी हिदायत पटेलला उमेदवारी देण्यासाठी आपला विरोध होता. मात्र, काँग्रेसने हिदायत यांना उमेदवारी देऊन मला आव्हान दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर
आज सोलापूरात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोलापूरातून त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे तर भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असणार आहे.