सोलापूर- पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या मजूरांच्या संयमाचा बांध सूटत आहे. 50 दिवसापेक्षा जास्त दिवस लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या मजूरांनी आता पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे मजूर त्यांच्या लेकरा बाळांसह छत्तीसगड, मध्यप्रदेशला जाण्यासाठी रस्त्यावरून चालत निघाले आहेत.
परप्रांतीय मजुरांचा संयम सुटला, गावी जाण्यासाठी लहानग्यांसह पायपीट सुरू - lockdown in solapur
परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात कामाला येतात. अशात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो परप्रांतीय मजूर अडकून पडलेले आहेत. मागील 50 दिवसापेक्षा जास्त काळापासून या मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे, दररोजच्या जेवणाचेदेखील हाल होत असल्याने या मजूरांचा संयम सूटत चालला आहे. हे मजूर आता त्यांच्या मूळगावी पायी निघाले आहेत.
परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात कामाला येतात. अशात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो परप्रांतीय मजूर अडकून पडलेले आहेत. मागील 50 दिवसापेक्षा जास्त काळापासून या मजूरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे, दररोजच्या जेवणाचेदेखील हाल होत असल्याने या मजूरांचा संयम सूटत चालला आहे. हे मजूर आता त्यांच्या मूळगावी पायी निघाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील हजारो मजूर हे सध्या महामार्गावरुन चालत गावी निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातूनदेखील हजारो लोक राष्ट्रीय महामार्गावर पायपीट करताना दिसत आहेत. या मजूरांना एकच चिंता लागली आहे, ती म्हणजे आपले गाव गाठण्याची. संसार डोक्यावर घेऊन आपल्या मुला-बाळांसह उन्हात हे मजूर पायपीट करत आहेत.