सोलापूर- शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडा या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेसमोर बुधवारी (दि. 2 जून) ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन माजी आमदार दिलीप माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक अमोल शिंदे, तसेच व्यापारी संघटनेचे नेते, पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.
उद्या बाजारपेठा खुले होण्याची शक्यता
चंदूसिंह देडीया या व्यापाऱ्याने तर प्रतिकात्मक सलाईन लावून बेडवर झोपून आंदोलन केले. एक तासानंतर व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील सर्व बाजारपेठा खुले करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचे संताप पाहून आयुक्तांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोनवरून संपर्क केला. त्यानंतर मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबर बोलणे झाले. दुकाने खुली करण्याबाबत सकारात्मक तोंडी आदेश देण्यात आले आहे गुरुवारपासून सर्व बाजारपेठा खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.