सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. आज (शुक्रवार 1 मे) सकाळी 9 वाजता दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करण्यात आला.
कोविड-19 कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. कामगारांच्या हाताला काम मिळणे बंद झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता, परिस्थितीचा विचार न करता, टाळेबंदी जाहीर केली. याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनता आणि कामगारांवर झाला. उपासमार आणि बेरोजगारीमुळे जनतेचा प्रक्षोभ वाढून हाहाकार माजेल. त्यावर वेळीच उपाययोजना करायला पाहिजे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते कॉ. आडम मास्तर यांनी व्यक्त केले. कामगार दिन, महाराष्ट्र दिन, सोलापूर महानगरपालिका स्थापना दिन यांच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या.
हेही वाचा...महाराष्ट्राचा वर्धापनदिन : पंतप्रधान मोदीही म्हणाले 'जय महाराष्ट्र'!
माकपच्या पक्ष शाखांच्या वतीने आपापल्या घरावर सामाजिक अंतर ठेवून ध्वजारोहण करण्यात आले. माकपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात नगरसेविका कॉ. कामीनीताई आडम, सिध्दपा कलशेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला यांच्या उपस्थितीत रंगप्पा मरेड्डी, मुरलीधर सुंचू, अशोक बल्ला, अनिल वासम, प्रशांत म्याकल, बापू साबळे, किशोर मेहता, श्रीनिवास कुणी, गंगुबाई कणकी आदी, श्रीनिवास गड्डम,वसीम मुल्ला, विजय हरसुरे आदींनी सहभाग नोंदवला.
कामगारांनी घेतली प्रतिज्ञा...
"या २०२० सालच्या मे दिनी आम्ही, कामगार आणि कष्टकरी लोक प्रतिज्ञा घेतो की आम्ही,
विषाणूशी लढण्यासाठी एकजूट करू, सुरक्षित राहू आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करू.
कोरोना विषाणूमुळे तीव्र झालेल्या आर्थिक संकटाचे संपूर्ण ओझे कामगार वर्गावर टाकण्याच्या भांडवलदारांच्या