महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता दर रविवारीही सुरू राहणार सोलापूरची बाजारपेठ - पालिका आयुक्त - लेटेस्ट बाजारपेठ न्यूज

मिशन बिगीन अंतर्गत शहरात लावण्यात आलेली बंधने कमी करण्यात येत आहेत. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी लावलेल्या शिस्तीमुळे नागरिकांमध्ये देखील स्वयंशिस्त आली आहे.

solapur
सोलापूर महानगरपालिका

By

Published : Aug 29, 2020, 10:52 PM IST

सोलापूर- महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शनिवारी मोठा निर्णय घोषित केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली होती. हळूहळू ही बंधने शिथिल होत आहेत. सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांनी नवा निर्णय जाहीर केला असून मिशन बिगीन अगेन अंतर्गत दर रविवारीही सोलापूर शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


बाजारपेठ बंद झाल्याने अनेक व्यवसायिकांचे हाल झाले होते. आयुक्तांनी शनिवारी घेतलेल्या निर्णयाने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्राहक हे सुट्टीच्या दिवशीच म्हणजे रविवारी बाजारपेठांत खरेदीसाठी दाखल होत असतात. पण, रविवारी बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांची व व्यपाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. या निर्णयाने रविवारी देखील ग्राहकांची वर्दळ दिसणार आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरात लावण्यात आलेली बंधने कमी करण्यात येत आहेत. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी लावलेल्या शिस्तीमुळे नागरिकांमध्ये देखील स्वयंशिस्त आली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या निर्देशात दुकानधारकांना नियमावली देखील जाहीर केली आहे. दुकानासमोर किंवा बाजारपेठ गर्दी झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी बोलताना दिली.

ऐन सणासुदीला ग्राहकांना बाजारात जाऊन खरेदी करता यावी यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. शहरात अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्ण लवकर आढळून येत आहेत. प्रशासन ताबडतोब संबंधित रुग्णास क्वारंटाइन करत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत आहे. शहरातील मृत्यू दर व रुग्ण संख्या दर कमी होत असल्याने महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी देखील दुकाने व बाजारपेठा सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण आदेश काढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details