माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील एका गावातील अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करुन त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे ३५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र काढून घेतल्याची घटना २७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. संबधित पीडित अंगणवाडी सेविकेने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सागर महादेव तोर (रा.उपळाई खुर्द, ता.माढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडियो देखील समोर आला आहे.
माढ्यात अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करून मंगळसूत्र लंपास, आरोपीची पोलिसांशी हुज्जत - molestation news
माढा तालुक्यातील एका गावातील अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करुन त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे ३५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र काढून घेतल्याची घटना २७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. संबधित पीडित अंगणवाडी सेविकेने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सागर महादेव तोर (रा.उपळाई खुर्द, ता.माढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अंगणवाडी सेविकेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अंगणवाडी सेविका या मैत्रिणी समवेत गावच्या शिवारात फिरत असताना संशयित आरोपीने अंगणवाडी सेविकेच्या पाठीमागे येऊन त्यांच्याकडे वाईट हेतूने पाहून अश्लील हावभाव केले. सेविकेसह मैत्रिणीकडे पाहून शिट्टी वाजवली. अंगावर धावून येऊन सेविकेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे ३५ हजार किंमतीचे काढुन घेतले. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक शिकतोडे करत आहेत.
पोलिसांशी आरोपीची हुज्जत -
या प्रकरणातील आरोपी सागर तौर याने माढा पोलिस ठाण्यात आल्यावर कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार यांचेसह अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. पोलिसांची कॉलर पकडून तोर याने शाब्दिक बाचाबाची देखील केली. ठाणे अंमलदार यांचेशी हुज्जत घालत असताना पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी धावून आले आणि ठाणे अंमलदार त्या पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या. खाकी वर्दीतील ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या आरोपीवर वरिष्ट पोलिस अधिकारी काय कारवाई करणार ? याकडे लक्ष लागले आहे.