सोलापूर - वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका जिह्यातील अनेक गावांना बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील केळीच्या बागा भुईसपाट, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान - farmer
वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका जिह्यातील अनेक गावांना बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी माढा तालुक्यातील टेंभुर्णी, कंदर, अकोले यासह माळशिरस तालुक्यातील श्रीपूर या गावातील केळीच्या बागा उद्धस्त झाल्या आहेत. या भागात जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये केळी, ऊस, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
केळीचे आगार असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर गावातील शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली आहेत.