माढा - गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे जन्मदात्या आईनेच २१ वर्षीय मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. सिध्देश्वर सुभाष जाधव असं त्या निष्पाप मुलाचे नाव आहे. आई मुक्ताबाई जाधव, अन् प्रियकर तात्या कदम या दोघांना टेभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांनी केलेल्या चौकशीत या दोघांनीही सिद्धेश्वरचा निर्घृण खून केल्याची कबुली देखील दिली आहे.
आई मुक्ताबाई अन् तात्या कदम याच्यांमध्ये असलेल्या अनैतिक संबधाला सिद्धेश्वरचा विरोध होता. राग अनावर झाला अन् या दोघांनीही सिद्धेश्वरचा खात्मा केला. फरार प्रियकराला उंबरे (पागे) ता. पंढरपुर येथुन रविवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माढा न्यायालयाच्या आदेशाने आईला अन् तिच्या प्रियकराला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
तसेच पत्नीने बाहेर ठेवलेले अनैतिक संबंध पती सुभाष जाधव यांना खटकत होते. ते दोन वर्षापासून घर सोडुन बेपत्ताच आहेत. २४ डिसेंबरच्या रात्री ११ वाजतापासून सिद्धेश्वर हा बेपत्ता होता. २५ डिसेंबर रोजी दुपारी साडे तिन वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वरचे प्रेत गावच्या माळरानावरील एका चारीत पडलेले दिसले. सिद्धेश्वरच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार केलेले होते.