सोलापूर - जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे येत्या ७ ते १३ ऑगस्टदरम्यान शहर आणि तालुक्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली.
पंढरीत ७ ते १३ ऑगस्टपर्यंत संचारबंदी
पंढरपूर आणि तालुक्यात ७ ऑगस्ट मध्यरात्रीपासून ही संचारबंदी लागू होणार आहे. ही संचारबंदी 7 दिवसांची असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा मात्र चालू राहणार आहेत. त्या रुग्णालय, मेडीकल, दूधसंस्था यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. ७ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत याची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

संचारबंदीच्या काळात प्रदक्षिणा रोड तसेच पंढरपूर येथील रेड झोनमधील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी असणार आहे. त्यामध्ये १३ ऑगस्टनंतर ही संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.