सोलापूर -महापालिका निवडणुकीसाठी मुंबई वगळता सर्वत्र तीन सदस्यीय प्रभाग करण्यात येणार आहे. यामुळे फायदा होईल असे बहुतांश पक्षांचे मत आहे. मात्र सोलापुरातील स्थानिक नेते याला विरोध करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असलेले नेते महेश कोठे यांनी याला विरोध केला असून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये अडचणी येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी देखील याला विरोध केला आहे.
तीन सदस्यीय प्रभाग पद्धत रचनेमुळे अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन सदस्यीय प्रभाग पद्धत हवी होती. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने सोलापूर शहरात 34 प्रभाग होतील. काही ठिकाणी दोन पुरुष, एक महिला तर काही ठिकाणी दोन महिला एक पुरुष असे उमेदवार असतील. विकासकामे करताना मोठी अडचण निर्माण होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबत संपर्कात आहे. त्यांकडे पुन्हा एकदा विनंती करून ही तीन सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करण्याची मागणी किंवा विनंती करणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते महेश कोठे यांनी दिली आहे.
'तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने भाजपाला फायदा होणार'