भाजपच्या समाधान अवताडे यांना ईव्हीएम व टपाली 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांना मतदान एकूण 1लाख 5 हजार 717 मते मिळाली आहेत. समाधान अवताडे यांनी 3 हजार 733 मतांनी बाजी मारली आहे.
पंढरपूर-मंगळवेढामध्ये भाजपचे 'समाधान', 3 हजार 733 मतांनी आवताडे विजयी - राष्ट्रवादी काँग्रेस
16:55 May 02
पंढरपूर-मंगळवेढामध्ये भाजपचे 'समाधान', 3 हजार 733 मतांनी आवताडे विजयी
16:49 May 02
टपाली मतदानातही भाजप आघाडीवर
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठीचे टपाली मत मोजणी झाली आहे.भाजपचे समाधान अवताडे यांना एकूण 1 हजार 676 टपाली मते मिळाली असून महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांना 1 हजार 446 मते मिळाली आहेत. टपाली मत मोजणीतही भाजप आघाडीव
भगीरथ भालके(महाविकास) एकूण 1446
भाजपचे समाधान अवताडे टपाली मतदानातून 230 मतांनी आघाडीवर
15:39 May 02
टपाली मत मोजणी सुरू
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टपाली मत मोजणी सुरू झाली आहे. ही मतमोजणी दोन फेऱ्यात होणार असून प्रत्येक फेरीत साडेतीन हजार, असे सात हजार मते मोजली जाणार आहेत.
15:37 May 02
भाजपचे समाधान आवताडे 36 व्या फेरीअखेर 4 हजार 256 मतांनी आघाडीवर
भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंनी 36 व्या फेरीअखेर 4 हजार 103 मतांनी मुसंडी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे यांना 1 लाख 4 हजार 285 मते तर महाविकास आघाडीचे भगीरथ भालके 1 लाख 183 मते मिळाली आहेत. भाजपचे समाधान अवताडे 4 हजार 103 मतांनी आघाडीवर आहेत.
15:04 May 02
भाजपचे समाधान आवताडेंनी ओलांडला 1 लाख मतांचा टप्पा
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 35 व्या फेरी अखेर भाजपच्या समाधान आवताडे यांनी एक लाख मतांचा टप्पा ओलांडला आहे. भाजपचे समाधान अवताडे यांनी 1 लाख 1 हजार 660 तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांनी 97 हजार 212 मते मिळवली आहेत. भाजपचे समाधान अवताडे 4 हजार 448 मतांनी आघाडीवर आहेत.
15:00 May 02
भाजपचे समाधान आवताडे 34 व्या फेरीअखेर 4 हजार 133 मतांनी आघाडीवर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे 98 हजार 432 तर महाविकासचे भगीरथ भालके यांना 94 हजार 299 मते मिळवली आहेत. भाजपचे समाधान अवताडे 4 हजार 133 मतांनी आघाडीवर आहेत
14:55 May 02
भाजप 32 व्या फेरीअखेर 4 हजार 945 मतांनी आघाडीवर
भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी 32 व्या फेरीअखेर 96 हजार 574 मतं मिळवली तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके 91 हजार 629 भाजपचे समाधान अवताडे 4 हजार 945 मतांनी आघाडीवर आहेत.
14:51 May 02
भाजपच्या आवताडेंची 5 हजार 958 मतांनी आघाडी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत 31व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांना 91 हजार 437 तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांनी 85 हजार 479 मत मिळवले. सध्या भाजपचे समाधान आवताडे 5 हजार 958 मतांनी आघाडीवर आहेत.
14:12 May 02
समाधान अवताडे निर्णायक आघाडीच्या नजिक
27 व्या फेरी अखेरची स्थिती
समाधान अवताडे (भाजप) 80 हजार 557 मते
भगीरथ भालके(महाविकास) 73925 मते
समाधान अवताडे 6632 मतांनी आघाडीवर
14:11 May 02
समाधान अवताडेंची आघाडी कायम
26 व्या फेरी अखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप) 77438 मते
भगीरथ भालके(महाविकास ) 77121 मते
समाधान अवताडे (भाजप) हे 6317 मतांनी पुढे
13:13 May 02
25 व्या फेरीनंतर समाधान अवताडे 6334 मतांनी आघाडीवर
25 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप) 75073 मते
भगीरथ भालके(महाविकास आघाडी )68739 मते
भाजपचे समाधान अवताडे 6334 मतांनी आघाडीवर
13:05 May 02
24 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची 6056 मतांनी आघाडी
24 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप) 71584 मते
भगीरथ भालके(महाविकास आघाडी) 65528 मते
समाधान अवताडे (भाजप)चे उमेदवार 6056 मतांनी पुढे
13:00 May 02
23 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी, मताधिक्य पुन्हा घटले
23 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे (भाजप) 68602 मते
भगीरथ भालके(महाविकास) 65974 मते
समाधान अवताडे 2628 मतांनी आघाडीवर
12:59 May 02
समाधान अवताडेंचे मताधिक्यही वाढले
22 व्या फेरी अखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप)64810 मते
भगीरथ भालके(60864) मते
भाजपचे समाधान अवताडे 3946 मतांनी आघाडीवर
12:57 May 02
21 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
21 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप) 62056 मते
भगीरथ भालके(महाविकास आघाडी) 58809 मते
समाधान अवताडे (भाजप)चे 3247 मतांनी आघाडीवर
12:42 May 02
समाधान अवताडेंची निर्णायक आघाडीकडे वाटचाल
भाजपच्या समाधान अवताडेंची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. 21 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंनी 3247 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या 17 फेऱ्या अजून बाकी आहेत. त्यामुळे या फेऱ्यांमध्ये समाधान अवताडेंची आघाडी मोडून काढण्याचे आव्हान भागीरथ भालकेंसमोर असणार आहे. मात्र सध्याच्या आघाडीने समाधान अवताडेंच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. तर महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळत आहे.
21 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप) 62056 - मते
भगीरथ भालके(महाविकास आघाडी) 58809 - मते
समाधान अवताडे (भाजप)चे 3247 मतांनी आघाडीवर
12:38 May 02
भाजपच्या समाधान अवताडेंची आघाडी कायम
20 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे(भाजप)-58787 मते
भगीरथ भालके(महाविकास आघाडी) 57046 मते
समाधान अवताडे (भाजप) हे 1741 मतांनी आघाडीवर
12:18 May 02
19 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
19 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 55559 मते
भगीरथ भालके - 54664 मते
समाधान अवताडे 19 व्या फेरीअखेर 895 मतांनी आघाडीवर
12:07 May 02
18 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
18 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 52450 मते
भगीरथ भालके - 51384 मते
समाधान अवताडे 1066 मतांनी आघाडीवर
12:06 May 02
17 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
17 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 49122 मते
भगीरथ भालके - 48367 मते
समाधान अवताडे 755 मतांनी आघाडीवर
12:05 May 02
16 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडीवर
16व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 45934 मते
भगीरथ भालके - 44707 मते
समाधान अवताडे 16 व्या फेरीअखेर 1227 मतांनी पुढे
12:04 May 02
15 व्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
15 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 41933 मते
भगीरथ भालके - 41557 मते
समाधान अवताडे 376 मतांनी पुढे
11:59 May 02
14 व्या फेरीअखेर समाधान अवताडे आघाडीवर
14 व्या फेरी नंतरची स्थिती
समाधान अवताडे - एकूण 38855 मते
भगीरथ भालके - 37842 मते
समाधान अवताडे 1013 मतांनी पुढे
11:31 May 02
13 व्या फेरीअखेर समाधान अवताडे 1005 मतांनी आघाडीवर
13 व्या फेरी अखेर आघाडी कायम ठेवत समाधान अवताडेंनी 1005 मतांची लीड घेतली आहे.
13 फेरीनंतरची स्थिती
समाधान अवताडे - एकूण 35893 मते
भगीरथ भालके - एकूण 34834 मते
समाधान अवताडे 1005 मतांनी आघाडीवर
11:13 May 02
सलग पाच फेऱ्यांपासून समाधान अवताडेंची आघाडी कायम
भाजपच्या समधान अवताडेंनी सलग पाच फेऱ्यांपासून आघाडी कायम ठेवली आहे. सातव्या फेरीपासून समाधान अवताडे आघाडीवर आहेत. बाराव्या फेरीअखेर ते 1214 मतांनी आघाडीवर आहेत.
12 व्या फेरीअखेरची स्थिती
समाधान अवताडे - 33229 मते
भगीरथ भालके - 32015 मते
समाधान अवताडे 1214 मतांनी आघाडीवर
----------------------
अकरावी फेरी
समाधान अवताडे - 30975 मते
भगीरथ भालके - 29667 मते
11:01 May 02
दहाव्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी कायम
भाजपच्या समाधान अवताडेंनी दहाव्या फेरीअखेर आघाडी कायम ठेवली आहे. ते 1643 मतांनी आघाडीवर आहेत.
दहाव्या फेरीअखेर मिळालेली मते
समाधान अवताडे - एकूण 28776 मते
भगीरथ भालके - एकूण 27133 मते
समाधान अवताडे 1643 ने पुढे
10:35 May 02
नवव्या फेरीनंतर समाधान अवताडे आघाडीवर
मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर भाजपचे समाधान अवताडे 1838 मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत.
दहावी फेरी सुरू
समाधान आवताडे : 28885 मते
भागीरथ भालके : 27047 मते
10:13 May 02
सातव्या फेरीअखेर समाधान अवताडेंची आघाडी
मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर भाजपच्या समाधान अवताडेंनी आघाडी घेतली आहे. त्यांनी 1000 मतांची आघाडी घेतली आहे.
09:43 May 02
पाचव्या फेरीअखेर भागीरथ भालके 664 मतांनी पुढे
भागीरथ भालकेंनी पाचव्या फेरीनंतरही आघाडी कायम राखली आहे. ते 664 मतांनी पुढे आहेत. 38 पैकी 33 फेऱ्या अजून बाकी आहेत.
पाचवी फेरी
समाधान आवताडे : 14059 मते
भागीरथ भालके : 14717 मते
09:39 May 02
तिसऱ्या फेरीनंतर भागीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे भागीरथ भालके 650 मतांनी पुढे आहेत.
तिसरी फेरी
समाधान आवताडे : 7978 मते
भागीरथ भालके : 8613 मते
09:33 May 02
दुसऱ्या फेरीनंतर भागीरथ भालके आघाडीवर
दुसऱ्या फेरीच्या मतमजोणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार भागीरथ भालके आघाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते
समाधान आवताडे : 2648
भागीरथ भालके : 3112
शैलजा गोडसे: 600
सचिन पाटील: 0
सिद्धेश्वर आवताडे: 7
09:23 May 02
दुसऱ्या फेरीत भाजप-राष्ट्रवादी समसमान
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपच्या समाधान आवताडेंनी साडेचारशे मतांची आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या फेरीत भाजप-राष्ट्रवादीला समसमान मते मिळाली
08:25 May 02
टपाली मतांच्या मोजणीने सुरूवात
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला टपाली मतांच्या मोजणीने सुरूवात झाली आहे. 3500 टपाली मतदार आहेत. मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून कडक व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना कोरोना नियमांचे पालन करून प्रवेश देण्यात आला आहे. तर मतमोजणी कक्षात ज्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी केली नव्हती त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
08:17 May 02
मतमोजणीला सुरूवात
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
08:12 May 02
मतमोजणीला सुरुवात..
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, थोड्याच वेळात पहिले कल हाती येतील.
07:28 May 02
अशी होणार मतमोजणी
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 65.73 टक्के मतदान यावेळी झाले. 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सकाळी 10 वाजता पहिला कल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. दुपारी 2 वाजपेयर्पंतच्या मतमोजणीत चांगली चुरस लागल्याचे चित्र दिसू शकेल. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. एकूण 14 टेबलांवर 38 फेर्यांत मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 160 अधिकारी, कर्मचारी व मदतनीस राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाव्दारे 80 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाआहे. तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचीही मतमोजणी होणार आहे.
06:09 May 02
पंढरपूर-मंगळवेढामध्ये भाजपचे 'समाधान', 3 हजार 733 मतांनी आवताडे विजयी
पंढरपूर :संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके विरूद्ध समाधान अवताडे अशी सरळ लढत बघायला मिळाली. त्यामुळे आता मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी मतमोजणीनंतरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दिवंगत माजी आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने सर्व ते उपाय करण्यात आले आहे. मतमोजणी टेबलवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड, पीपीई किट, उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. तसेच, मतदान कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
66 टक्के मतदान
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी एकूण 66.15 टक्के टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके व भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळाली. अपक्ष उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन पाटील यांचेही भवितव्य मतपेटीत बंद असून आता निकालांकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतमोजणी केंद्रात आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. यासाठी आरोग्य सुविधा कक्ष, प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले.