सोलापूर - बार्शी येथील न्यायालयाने महेश भारत मिसाळ (वय 24 वर्षे , रा. खामसवाडी, कळंब, उस्मानाबाद) याला गर्भवती पत्नीचा खून प्रकरणी जन्मठेप सुनावली आहे. महेश मिसाळ याला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने पत्नीस फिरण्यास रानात नेले. त्यानंतर चाकूने भोसकून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला. याबाबत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- पत्नीला प्रेमसंबंधाबाबत समजले होते
मनीषा दादाराव फुगारे हीचा विवाह 7 मे 2017 रोजी महेश मिसाळसोबत झाला होता. महेश हा पत्नी मनीषा हिला घेऊन पुणे येथे राहत होता. पण, महेशचे नात्यातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या नेहमी संपर्कात होता. ही बाब मनीषाच्या लक्षात आली होती. यामुळे मनिषाने यास विरोध केला होता.
- असा केला खून
मनीषा याचे माहेर बार्शी येथील कोंबडवाडी येथील आहे. गर्भवती असल्याने महेश पत्नीला जानेवारी, 2018 मध्ये माहेरी आणले होता. त्यानंतर त्याने सासरवाडीतून मेव्हणीकडे पाथरी येथे जाण्यासाठी तिला घेऊन निघाला होता. पाथरी येथे महेश मिसाळने आपली दुचाकी माळरानात आडवाटेने वळविली. त्यानंतर काही अंतरावर जात लघुशंकेचे कारण सांगत दुचाकी थांबवली. मनीषाचे आपल्याकडे लक्ष नसल्याचा फायदा घेत त्याने मागून येत त्याच्या डोक्यात दगड घातला आणि चाकूने भोसकले. यातच तिचा मृत्यू झाला.
- लूटमार झाल्याचा केला होता बनाव
महेश मिसाळ याने स्वतःवर देखील 18 वार करून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला. काही जण लूटमार करण्यासाठी आले आणि मला व माझ्या पत्नीला मारहाण करून लूटमार करून निघून गेले, अशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी मनीषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पंचनामा केला. पण, महेशची तक्रार व घटनास्थळावरील दृश्य यामध्ये तफावत आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी याची कसून तपासणी करत खरी माहिती समोर आणली आणि महेश यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
- असा झाला युक्तीवाद