सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडेल आणि विकासाच्या मुद्यांवर 2014 ची लोकसभा निवडणूक लढली आणि ती जिंकली. मात्र, गेल्या ५ वर्षांत मोदींना देशामध्ये विकास साधण्यात अपयश आल्यामुळेच ते आता प्रचारामध्ये फक्त राष्ट्रवाद आणत असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.
विकासकामे न केल्याने मोदींच्या सभेत राष्ट्रवाद; खासदार कुमार केतकरांची टीका - election
सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी खासदार कुमार केतकर हे सोलापुरात आले होते.
सध्या देशामध्ये माध्यमांच्या बाबतीत वाईट परिस्थिती असून जवळपास सर्वच माध्यमही काय दाखवायचे आणि काय नाही दाखवायचे यावर काम करत आहेत. माध्यमातूनच लोकांचे मत बदलविण्याची प्रक्रिया सध्या केली जात आहे. माध्यमातील या सर्व गोष्टीकडे डोळस नजरेने पाहणे गरजेचे असल्याचेही कुमार केतकर यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी कधी कधी बूथ मतदान केंद्र किंवा मतपेट्या ताब्यात घेतल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हे सर्व काही न होता माध्यमांद्वारे मतदारांना कॅप्चर केले जात आहे. गेल्या पाच ते दहा वर्षांत निवडणुकीच्या काळात प्रसिद्धीमाध्यमांचा दुरुपयोग करण्यात आला आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करायची आणि कोणती बातमी दाबायची ही सर्व यंत्रणा ठरवीत असल्याचा सनसनाटी आरोपही कुमार केतकर यांनी यावेळी केला.
सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी खासदार कुमार केतकर हे सोलापुरात आले होते. यावेळी कुमार केतकर यांनी सोलापूर शहरातील बुद्धिवंत विचारवंतांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे हल्ला घडला त्यानंतर सर्जिकल स्ट्राइक घडवून आणला या सर्व गोष्टी करत असताना मोदी यांनी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत फक्त राष्ट्रवाद पुढे केला जात आहे. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स आले कुठून या प्रश्नाचे उत्तर अजूनही दिलेले नाही, असे असताना देखील सैनिकांच्या हौतात्म्यांचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.