महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोळी बांधवांना चंद्रभागेच्या पात्रात होडी नेण्यास मज्जाव; प्रशासनाकडून दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय

आज पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पात्रातल्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे पंढरपूरशी जोडले जाणारे प्रमुख दोन्ही पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र कोल्हापुरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने कोळी बांधवांना आपल्या होड्या पुराच्या पाण्यात नेण्यास मज्जाव केला आहे.

किनाऱ्यावर लागलेल्या होड्या

By

Published : Aug 9, 2019, 3:14 AM IST

सोलापूर- पलूस बामनाळ येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या होडी चालकांना प्रशासनाने आपल्या होड्या किनाऱ्याला लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्या पात्रातील जवळपास दीडशे ते पावणेदोनशे होड्या आत्ता किनारी लागल्या आहेत. फक्‍त आपत्कालीन परिस्थितीतच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी या होड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

कोळी बांधवांना चंद्रभागेच्या पात्रात होडी नेण्यास मज्जाव

आज पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पात्रातल्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे पंढरपूरशी जोडले जाणारे प्रमुख दोन्ही पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र कोल्हापुरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने कोळी बांधवांना आपल्या होड्या पुराच्या पाण्यात नेण्यास मज्जाव केला आहे. फक्त पूरग्रस्तांना गरज पडल्यास मदत म्हणून होडीचा वापर केला जाणार आहे. याला होडी चालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सध्या चंद्रभागेच्या पत्रात 1 लाख 74 हजार 97 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून अजूनही धोका टळलेला नाही. मात्र नौका विहाराच्या हौसेखातर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे जाणकारांकडून स्वागत होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details