करमाळा (सोलापूर) - कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून भारतातही या संकटामुळे लॉकडाऊन केले आहे. संचारबंदीच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून केम येथे शिवशक्ती प्रतिष्ठाणने निराधारांचा आधार बनत गावातील विधवा, निराधार, परितक्ता महिला तसेच वयोवृद्ध व अपंग अशा ८० कुटुबांना प्रति कुटुंब ५०० रुपयांचे किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली.
केम येथे निराधारांचा आधार बनली शिवशक्ती प्रतिष्ठाण ; 80 कुटूंबाना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप - कोरोना
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून केम येथे शिवशक्ती प्रतिष्ठाणने निराधारांचा आधार बनत गावातील विधवा, निराधार, परितक्ता महिला तसेच वयोवृद्ध व अपंग अशा ८० कुटुबांना प्रति कुटुंब ५०० रुपयांचे किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी जीवनावश्यक वस्तू यामध्ये गहू आटा, तांदुळ, तेल, सर्व प्रकारच्या दाळी, साखर, चहा, बिस्कीट, तिखट, मीठ, अंगाचे व कपड्याचे साबण सध्या गरजेच्या वस्तूंचे किट तयार करणेत आले व मंडळातील सदस्यांनी गरजू लोकांना घरपोच केले.
यावेळी सागर दोंड, आनंद शिंदे, भिमा शिंदे सर,संतोष जगताप, विजय दोंड, अवधूत येवले, सचिन बिचीतकर, गोपाळ दोंडसाहेब, गणेश पवार साहेब, भालचंद्र गावडे गुरुजी, प्रशांत चंद्रकात दोंड, राजाभाऊ गोडसे, राजेंद्र दोंड, समाधान दोंड, सचिन दोंड, दत्तात्रेय रंदवे गुरूजी, बाळासाहेब म्हेत्रे, मधु पाटील, मनोज वासकर, राजेश दुर्गूळे, सिध्दनाथ घाडगे, अशा लोकांकडून देणगी प्राप्त झाली या करिता शुभम साखरे,अनिल दोंड, राकेश दोंड, अक्षय दोंड, अनिकेत खंदारे, सुरज वेदपाठक, किरण खरवडे, प्रथमेश ननवरे आदिंचे सहकार्य लाभले.