महाराष्ट्र

maharashtra

Border Dispute : बोम्मईंचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे, नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

By

Published : Nov 28, 2022, 6:02 PM IST

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe ) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Neelam Gorhe criticizes Basavaraj Bommai ) यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हातपाय आपटत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ( Maharashtra Karnataka border dispute ) अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली ( Gorhe criticizes Basavaraj Bommai ) आहे.

Border Dispute
नीलम गोऱ्हे

सोलापूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Neelam Gorhe criticizes Basavaraj Bommai ) यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हातपाय आपटत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe ) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ( Gorhe criticizes Basavaraj Bommai ) केला आहे.

बोम्मईचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद -मुद्द्यावर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला मोठा इतिहास आहे.पण कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते एकप्रकारे न्यायसंस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई ( Chief Minister of Karnataka Bommai ) यांनी सांगली जिल्ह्याच्या जत आणि सोलापूर व अक्कलकोटवर ट्विट करत दावा सांगितला आहे. या ट्विटनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून कर्नाटक सरकारला इशारे दिले जात आहेत. महाराष्ट्र राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

बोम्मई म्हणजे बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे-महाराष्ट्र राज्यात कर्नाटक किंवा कानडी लोकांचा कधीच अपमान केला जात नाही. पण कर्नाटकातील बेळगावात मराठीचा अपमान होतो. सामोपचाराने मिटवून घ्यायचा ठेका केवळ महाराष्ट्रानेच घेतलेला आहे का? असा सावल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यांचा न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यासारख आहे, असे वाटत आहे. बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत.

हा वाद पेटविण्यामागे कोणी तरी षड्यंत्र आहे -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्राची भूमिका होती. त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही तीच भूमिका घेतली होती. तरीही बसवराज बोम्मई असे बेताल वक्तव्य करत असतील, तर नक्कीच त्यामागे कोणीतरी षडयंत्र रचत आहे. महाराष्ट्रा राज्याचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठीद्वेषी लोकांचा आहे, असं वाटत आहे. आम्ही कानडी लोकांच्या विरोधात नाही. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे ही चौकी आमची, ती चौकी आमची अशा पद्धतीच्या विषारी भावनेतून जे वक्तव्य करत आहेत, ते निश्चित निषेधार्ह आहे. असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details