महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : अवैध वाळू तस्करांवर करमाळा पोलिसांची कारवाई, 23 लाखाचा मुद्देमाल जप्त - सोलापूर बातमी

सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. करमाळा तालुक्यातील सांगवी येथे भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील संभाजी उत्तम सरडे (वय 50, रा. कवीटगाव), राजेंद्र मल्हारी ठोंबरे (रा. पांगरे), संदीप मच्छिंद्र खाडे (रा. शेलगाव) व तीन अज्ञात चालकांविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

करमाळा पोलीस
करमाळा पोलीस

By

Published : Jun 6, 2021, 5:31 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -करमाळा तालुक्यातील सांगवी येथे भीमा नदी पात्रातील अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांविरोधात करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत वाळू तस्करांकडून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करमाळा पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातमध्ये भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. करमाळा तालुक्यातील सांगवी येथे भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील संभाजी उत्तम सरडे (वय 50, रा. कवीटगाव), राजेंद्र मल्हारी ठोंबरे (रा. पांगरे), संदीप मच्छिंद्र खाडे (रा. शेलगाव) व तीन अज्ञात चालकांविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील सांगवी येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पथक तयार केले. त्या पथकाला सांगवी येथे भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याचे दिसून आले. या कारवाईमध्य पोलीस पथकाने एक्स कंपनीचा जेसीबी, स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व दोन चाकी डंपिंग टेलर 1 ब्रास वाळू, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, दोन चाकी डंपिंग टेलर, 1 ब्रास वाळू, एक न्यू हॉलांड कंपनीचा ट्रॅक्टर, एक दोन चाकी डंपिंग टेलर व 1 ब्रास वाळू असा एकूण 23 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.

हेही वाचा-अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून, कोरोनाने मृत्यू झाल्याचा बनाव

ABOUT THE AUTHOR

...view details