महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्क घोड्यावर स्वार होत झाशीच्या राणीच्या वेशात दाखल केला उमेदवारी अर्ज - vidhan sabha constituency

समाजसेविका जयश्री पाटील यांनी अनोख्या पद्धतीने सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. झाशीच्या राणीचा वेशभूषा परिधान करत थेट घोड्यावरून मिरवणुकीने जयश्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करण्यास जाताना पाटील

By

Published : Oct 3, 2019, 11:32 PM IST

सांगली - राजकीय उमेदवारांच्या गर्दीत सांगलीतील समाजसेविका जयश्री पाटील यांनी अनोख्या पद्धतीने सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. झाशीच्या राणीचा वेशभूषा परिधान करत थेट घोड्यावरून मिरवणुकीने जयश्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

झाशीच्या राणीच्या वेशात दाखल केला उमेदवारी अर्ज


सांगली शहरात सामजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जयश्री पाटील या सांगली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. अपक्ष म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत. आज (गुरुवार) पाटील यांनी आपला उमेदवारी अनोख्या पद्धतीने भरला आहे. झाशीच्या राणीच्या पोशाखात सांगली शहरातून कार्यकर्त्यांसमवेत शहरातून फेरी काढत मतदारांचे आशीर्वाद घेतला. यावेळी जयश्री पाटील यांच्या या घोड्यावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मिरवणूक चर्चेचा विषय बनला होता. तर याच पोशाखात जयश्री पाटील यांनी सांगलीतील निवडणूक कार्यालयात जाऊन आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details