सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर भाजपचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राज्यात सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.
फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. त्यात सोलापुरातील बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष जमीर शेख यांनी आमदार पडळकर यांच्यावर खरपूस टीका केली. शरद पवार साहेब महाराष्ट्रात राजकारण करत असताना गोपीचंद पडळकर यांना चड्डी घालता येत नव्हती, अशी टीका जमीर शेख यांनी केली.