सोलापूर- लॉकडाऊदरम्यान शहरात दारूची अवैधरित्या विक्री जोमात सुरू आहे. या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देशी विदेशी दारू अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक; सोलापुरात जेलरोड पोलीसांची कारवाई
सोलापुरातील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीमधील साई बाबा चौक येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या राजू श्रीनिवास गुंडला (वय २० वर्ष ) शरणाप्पा भिमन्ना मद्री (वय ४४ वर्ष) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान त्यांच्या कडून एकूण १५९ सीलबंद देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा एकूण ४७,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी गावठी दारू भट्ट्या उध्वस्त केल्या होत्या तर, कुंभारी गावाच्या शिवारात परमीट बार चालकाच्या घरीच दारू विक्री करताना त्याच्यांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांपासून तळीराम दारू साठी वणवण भटकत आहेत. त्यामुळे काही जण देशी विदेशी दारूचा साठा करून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत. अशाचप्रकारे शहरातील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीमधील साई बाबा चौक येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या राजू श्रीनिवास गुंडला (वय २० वर्ष ) शरणाप्पा भिमन्ना मद्री (वय ४४ वर्ष) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १५९ सीलबंद देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा एकूण ४७,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमधील दोन्ही आरोपींविरोधात जेलरोड पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरिक्षक अजित कुंभार,पोलिस हवालदार बाबर कोतवाल,पोलिस नाईक संदीप जावळे, विनायक बर्डे,पोलिस शिपाई उमेश सावंत,समर्थ शेळवणे,स्वप्निल कसगावडे महिला पोलिस शिपाई आरती यादव,चालक पोलिस शिपाई प्रफुल्ल गायकवाड यांनी केली.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात 15 मिनिटांत ई-पास देण्यासाठी 1500 रुपये घेणाऱ्या दोघांना अटक