महाराष्ट्र

maharashtra

विद्यापीठातील क्वारंटाइन केंद्राची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून पाहणी

By

Published : Jun 3, 2020, 5:20 PM IST

सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संभाव्य रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या वसतीगृहात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

Quarantine Centers in the Solapu
विद्यापीठातील क्वारंटाइन केंद्र

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वसतीगृहात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या क्वारंटाइन सेंटरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांना ठेवण्यासाठी जागा वाढविण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाच्या मुला- मुलींच्या वसतीगृहाचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना व नागरिकांना येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. मिलिंद शंभरकर आणि पी. शिवशंकर यांनी या केंद्राला भेट देऊन येथील नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तेथील भोजनाचा दर्जाही तपासली. यावेळी सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details