पंढरपूर -पंढरपूर येथील आदलिंगे कुटुंबाकडून शिवजन्मोत्सव निमित्ताने शिवगडाची स्थापना करण्यात आली. या गडामध्ये कोरोना काळात आपल्या सर्वांची सुरक्षा आरोग्यसेवक तसेच कोरोनापासून बचाव करणारी लस यांच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहे.
शिवजन्मोत्सव निमित्ताने गडाची निर्मिती -
कोरोना काळात अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींनी आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेसाठी निःस्वार्थ सेवा केली. या काळात कर्तव्य बजावत असताना अनेकांनी जीवही गमावले. अशा कोरोना योद्धांचा सन्मान करण्यासाठी आदलिंगे कुटुंबाकडून विविध कोरोना युद्धांच्या प्रतिमा असलेला तटबंदी व तटरक्षक म्हणून प्रतिमा तयार केले आहेत. त्यातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचे काम केले आहे.
मुख्यमंत्र्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वांच्या प्रतिमा -
कोरोना काळात कोरोना योद्धे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ते आमदारांपर्यंत तसेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्या प्रतिमा तयार केल्या आहेत. सर्वंनी तटरक्षक व तटबंदी म्हणून काम केले आहे. तर कोरोना विषाणूपासून अग्नीशामक दल, नगर पालिकेचे स्वच्छ्ता अधिकारी व कर्मचारी, साफ सफाई कर्मचारी, स्वयंसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते, संघटना, समाजसेवक, प्रसारमाध्यमे सर्वांनी निस्वार्थी सेवा केली आहे. प्रत्येकाच्या प्रतिमा गडाच्या तटरक्षक म्हणून उभारण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन नाही - आरोग्य विभाग