करमाळा (सोलापूर) - उजनी जलाशयातील पाणी कमी होताच टाळेबंदीची संधी साधून वाळूमाफियांनी भीमा नदी पात्रातील 30 ब्रास वाळूचा बेकायदा उपसा केला. ही वाळू कोंढार चिंचोली आणि जिंती येथे साठा करून ठेवली होता. त्या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने छापा मारुन तीन लाख रुपये किंमतीची वाळू जप्त केली. महसूल विभागाच्या पथकाने दोन दिवसात तीन लाखांची 30 ब्रास वाळू जप्त करून पंचनामा केला आहे.
करमाळ्यात महसूल विभागाकडून 30 ब्रास वाळू जप्त
कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनाने राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. याच काळात उन्हाळा असल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाले. याची संधी साधून वाळूमाफियांनी भीमा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू केला. तसेच काही वाळूमाफियांनी शनिवारी (दि. 30 मे) सायंकाळी पाच वाजता कोंढार चिंचोली येथे नदीपात्राजवळ दहा ब्रास वाळू साठा केला.
दोन्ही ठिकाणी छापा मारून जप्त केलेल्या 30 ब्रास वाळूसाठा जिल्हा परिषदेच्या कात्रज येथील विश्रामगृह आवारात ठेवण्यात आला. कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनाने राज्यात टाळेबंदी जाहीर झाली आहे. याच काळात उन्हाळा असल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाले. याची संधी साधून वाळूमाफियांनी भीमा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू केला. तसेच काही वाळूमाफियांनी शनिवारी (दि. 30 मे) सायंकाळी पाच वाजता कोंढार चिंचोली येथे नदीपात्राजवळ दहा ब्रास वाळू उपसा करुन साठा केला. महसूल विभागाच्या पथकाला याची माहिती मिळताच छापा मारून जप्त केला. महसूल पथकाने रविवारी (दि. 31 मे) दुपारी दोन वाजता जिंती येथे भीमा नदी पात्राजवळ खाराओढ्याजवळ अज्ञातांनी अनाधिकृत नदीपात्रातील वाळू उपसा करून साठा ठेवला होता. 20 ब्रास वाळू महसूल पथकाने छापा मारून जप्त केली.
तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील मंडळाधिकारी सादिक काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये कात्रजचे तलाठी गोडसे, जिंतीचे तलाठी शेटे, कात्रजचे पोलीस पाटील सोमनाथ पाटील, कोंढार चिंचोलीचे पोलीस पाटील हनुमंत भोसले, कावळवाडीचे पोलीस पाटील सुरेश शेजाळ, रामवाडीचे पोलीस पाटील तुकाराम वारगड हे सहभागी झाले होते.