सोलापूर - दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीसाठी फोन केला आहे. दोन डोस घेतलेले, प्रमाणपत्र असलेले लोक सहभागी होतील. तसेच, दहीहंडीचे थर जास्त नसतील याची काळजी घेऊन हा पारंपरिक सण साजरा करू द्या. अशी विनंती केली आहे. परंतु, या विनंतीनंतरही दहीहंडीला परवाणगी दिली नाही, तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
भाजप आमदार आशिष शेलार पत्रकारांशी बोलताना संघटनात्मक विषयांवर त्यांच्या बैठका
शेलार हे दोन दिवसीय सोलापुरात दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संघटनात्मक विषयांवर त्यांच्या बैठका होणार आहेत. आज सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चंद्रपूर इथे झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दल महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. या सरकारच्या काळात लोकांचे जीव असुरक्षित आहेत. सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलांवर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, पोलिसांवरचा सरकारचा वचकही निघून गेला आहे असही शेलार म्हणाले आहेत. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत. सामान्य माणसांचा जीव असुरक्षित झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची त्यांनी यावेळी विनंती केली.
'परवानगी दिली नाही, तर आंदोलन करणार'
दहीहंडी उत्सवाबाबत विचारले असता, दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीसाठी फोन केला आहे. दोन डोस घेतलेल्या प्रमाणपत्र असलेल्या जास्त उंच नसलेला असा पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या. पारंपारिक कमी गर्दीच्या व कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे. जर परवाणगी दिली नाही, तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेलार यांनी यावेळी दिली आहे.