महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयावरुन मुलांसमोरच पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून - गुन्हे बातमी

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधावारी (दि. 8 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी खूनी पतीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jul 9, 2020, 3:46 AM IST

सोलापूर -चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हणमंतू गोटे, असे आरोपी पतीचे नाव असून रेणुका हणमंतू गोटे (वय 27 वर्षे, रा. रविवार पेठ, सोलापूर), असे मृत पत्नीचे नाव आहे.

मृत रेणुका गोटे

या दाम्पत्यास दोन लहान मुले आहेत. आईचा जीव जाईपर्यंत दोन्ही मुले आई-वडिलांची भांडण घाबरुन बघत होती. या मुलांकडे पाहून परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

कुचन हायस्कूल जवळील वडार गल्ली येथे राहणारा हणमंतू गोटे हा पत्नी रेणुकाच्या चारित्र्याचा अनेक दिवसांपासून संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये सतत सतत भांडणे होत होती. बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारी दोघांमध्ये जोराचे भांडण सुरू झाले. या भांडणात हणमंतू याने रेणुका हीचा गळा आवळला. या झटापटीत रागाच्या भरात जीव जाईपर्यंत त्याने गळा सोडलाच नाही. मात्र, रेणुकाने आपला जीव सोडला. ती निपचित पडल्याचे दिसताच पतीने घटनास्थळावरुन पळ काढला.

आरोपी हणमंतू गोटे हा वाहन चालकाची नोकरी करतो. शेजारच्यांना घरात भांडणे होत असल्याची माहिती होती. अचानक भांडणाचा आवाज बंद झाला. शेजाऱ्यांना संशय येताच त्यांनी घरात डोकावून पाहिले. त्यावेळी रेणुका गोटे ही निपचित पडली होती. त्यांनी रेणुकास ताबडतोब सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीस दोन तासांतच ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा -मास्क न वापरणे पडले महागात..! आतापर्यंत 45 हजार वाहनचालकांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details