पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाचा सर्वाधिक फटका पंढरपूर शहर व तालुक्याला बसत आहे. येथील कोरोना रुग्णसंख्येने 100 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच पंढरपूर येथे कोरोनामुळे दोघा जणांचा मुत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पंढरपूरमध्ये 30 कोरोनाबाधित आढळले. तर कोविड सेंटरमधून 9 जणांना सुट्टी मिळाली.
पंढरपूरमध्ये कोरोनाची शंभरी पार तर 38 जणांची कोरोनावर मात - undefined
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 118 वर गेली आहे. त्यातील 77 जणांवर उपचार चालू आहेत. तसेच 38 जणांना घरी सोडण्यात आले आहे. दोघा जणांचा मुत्यूही झाला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पंढरपूर शहरांपुरता मर्यादित होता. ग्रामीण भागात अद्याप कोरोना रुग्ण सापडले नूव्हते. मात्र, इतर ठिकाणांहून तालुक्यात आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही सुरू झाला. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 118 वर गेली आहे. त्यातील 77 जणांवर उपचार चालू आहेत. तसेच 38 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात दोघा जणांचा मुत्यूही झाला आहे. शुक्रवारी कोरोनाग्रस्तांमध्ये 23 जण शहरी भागातील तर 6 जण ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाचा सर्वाधिक फटका पंढरपूर शहर व तालुक्याला बसत आहे. येथील कोरोना रुग्णसंख्येने 100 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच पंढरपूर येथे कोरोनामुळे दोघा जणांचा मुत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पंढरपूरमध्ये 30 कोरोनाबाधित आढळले. तर कोविड सेंटरमधून 9 जणांना सुट्टी मिळाली.
कोरोनाबाधित रुग्णांना वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, जुनी पेठ, लिंक रोड, गणेश नगर, भक्ती मार्ग, कराड नाका, रुक्मिणी नगर, सांगोला चौक, महापौर चाळ, संत पेठ, करकंब, गोपाळपूर, एकलासपूर या गाव भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
TAGGED:
1