महाराष्ट्र

maharashtra

संचारबंदीत अजब शक्कल, ढाब्यालाच कृषी केंद्राचे नाव देऊन सुरू केली दारू विक्री

By

Published : May 10, 2021, 7:15 AM IST

सोनके येथील सुरूची ढाबा मालकाने देशी दारू अड्डा चालवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्याने आपल्या हॉटेलवर 'जय मल्हार ॲग्रोटेक'चा बोर्ड लावून आतमध्ये अवैधपणे दारू विक्रीचे दुकान थाटले होते. शेतीशी निगडीत व्यवसायाच्या नावाखाली दारू विक्रीचा धंदा या ढाबा मालकाने सुरू केला होता.

pandhrpur crime
कृषी केंद्राच्या नावाखाली केली दारूची विक्री


पंढरपूर(सोलापूर) -जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात 15 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीच्या काळात औषधाची दुकाने आणि कृषी केंद्र उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या परवानगीचा गैर फायदा अवैध धंद्यासाठी केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपुरातील सोनके या गावात चक्क ढाब्यालाच कृषी केंद्राचा फलक लावून आतमध्ये दारू विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

कृषी केंद्राच्या नावाखाली केली दारूची विक्री

कोरोना काळात प्रशासकीय नियमांचा गैरवापर करत अशा प्रकारे अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी सोनके गावातील या अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ढाबा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगाप्पा कोळेकर असे दारू विक्री करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

ढाबा मालकाने चालवली देशी दारूविक्री शक्कल..

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. सोलापूर जिल्ह्यातही त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये औषध दुकानासह कृषी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत सोनके येथील सुरूची ढाबा मालकाने देशी दारू अड्डा चालवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्याने आपल्या हॉटेलवर 'जय मल्हार ॲग्रोटेक'चा बोर्ड लावून आतमध्ये अवैधपणे दारू विक्रीचे दुकान थाटले होते. शेतीशी निगडीत व्यवसायाच्या नावाखाली दारू विक्रीचा धंदा या ढाबा मालकाने सुरू केला होता.

कृषी केंद्राच्या नावाखाली केली दारूची विक्री
ग्रामीण पोलिसांनी केला दारू विक्रीचा भांडाफोड-

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना या दारू विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस पथकाने जय मल्हार ॲग्रोटेक दुकानावर छापा टाकून विविध कंपनीची देशी दारू जप्त केली. यामध्ये देशी दारू गुत्तेदार काशिलिंग उर्फ लिंगाप्पा कोळेकर याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत अडीच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details