महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाऊले चालती पंढरीची वाट...'अशी' पोहोचली वारी पंढरीमध्ये - तुकाराम महाराज

शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात. दरम्यान, एकादशीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पुजा करण्यात येते.

पाऊले चालती पंढरीची वाट...'अशी' पोहोचली वारी पंढरीमध्ये

By

Published : Jul 12, 2019, 2:24 AM IST

पंढरपूर- आषाढी एकादशी म्हटले की, आपल्याला माहित असते. ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात.

शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात. दरम्यान, एकादशीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पुजा करण्यात येते.

विठूरायाच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकऱ्यांसह 24 जूनला देहूनगरीतून संत तुकाराम महाराज तर, 25 जूनला आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले होते. शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त या २ पालख्यांसह अनेक संतांच्या पालख्या विठ्ठलनगरीत दाखल झाल्या.

तुकाराम महाराज पालखी सोहळा -

सोमवार, २४ जूनला प्रस्थान केल्यानंतर तुकाराम महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्का हा पुण्यातील इनामवाडा या ठिकाणी झाला. गुरुवारी ४ जुलैला बेलवंडी येथे या पालखीचे पहिलं गोल रिंगण पार पडले. तर, शुक्रवारी ५ जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण बांधण्यात आले. रविवारी ७ जुलैला सराटी येथे तिसरे गोल रिंगण पार पडले. यावेळी रात्रीचा मुक्काम अकलूजला होता.

सोमवारी ८ जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण घेण्यात आले. त्यानंतर बोरगावला रात्रीचा मुक्काम पडला. बुधवारी १० जुलैला बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण घेण्यात आले. तर वाखरी तळाला रात्रीचा मुक्काम झाला. गुरुवारी ११ जुलैला वाखरीत तिसरे उभे रिंगण घेण्यात आले. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढपुरात प्रवेश केला. त्यांचा रात्रीचा मुक्काम पंढरपुरात पडला.

दरम्यान, वाखरी येथे माऊलींच्या पालखीसह संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या दाखल झाल्या. यावेळी या भावंडांकडून मुक्ताबाईला साडीचोळीची भेट या ठिकाणी दिली जाते. शुक्रवारी १२ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलनगरीत दाखल झाल्या आहेत. मंगळवारी १६ जुलैला विठ्ठल रुक्मिणी भेट होणार असून १७ जुलैला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.

ज्ञानेश्वर महाराज पालखी -

मंगळवारी २५ जूनला श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान झाले. माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आजोळ गांधीवाडा आळंदीत झाला. मंगळवारी २ जुलैला श्रींचे नीरास्नान करण्यात आले. त्यानंतर रात्रीचा मुक्काम लोणंद या ठिकाणी झाला. बुधवारी ३ जुलैला चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण पार पडले. रविवारी ७ जुलैला सदाशिवनगर येथे पहिले गोल रिंगण पार पडले. यावेळी रात्रीचा मुक्काम माळशिरसला होता.

सोमवारी ८ जुलैला खुडुस फाटा येथे दुसरे गोल रिंगण बांधण्यात आले. मंगळवारी ९ जुलैला ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण पार पडले. तर भंडीशेगाव येथे रात्रीचा मुक्काम झाला. बुधवारी १० जुलैला बाजीरावाची विहिर येथे दुसरे उभे रिंगण घेतले तर याच ठिकाणी ४ थे गोल रिंगणही पार पडले. याच दिवशी तुमकारा महाराजांच्या पालखीसह अनेक संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या.

गुरुवारी ११ जुलैला वाखरीला पादुकेजवळ तिसरे उभे रिंगण घेण्यात आले. त्याच दिवशी माऊलींची पालखीने पालखीने पंढरपुरात प्रवेश केला. शुक्रवारी १२ जुलैला भागवत एकादशी असल्याने आषाढी यात्रा पंढरपुरात होत आहे.

मंगळवारी १६ जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी भेट आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जुलैला माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details