पंढरपूर (सोलापूर) -पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे विविध प्रकारची संकटं येत असून, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कुठे अतिवृष्टी तर किनारपट्टीवरती दरवर्षी चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू झालीय की काय अशी चर्चा होतेय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपुरातील तरुणांनी एकत्र येत 'हिरवगार पंढरपूर या संकल्पनेतून 'एक झाड एक कुटुंब' मोहिमेअंतर्गत प्रत्येक भागामध्ये हिरवाई करण्याचा निश्चय केला आहे. या संकल्पनेतून पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबियना एक झाड देऊन संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या संकल्पना अंतर्गतच हजारो झाडे देण्यात आली आहेत.
'एक झाड एक कुटुंब' मोहिमेतून पर्यावरणाचे संवर्धन -
पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज लक्षात घेऊन पंढरपूर शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन पंढरपूर शहर हे हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पनेअंतर्गत 'एक झाड एक कुटुंब' ही मोहीम राबवून वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, त्या झाडाची पालनपोषणाची जबाबदारी या कुटुंबाने उचलावी. या हेतूने पंढरपूर शहरातील अनेक कुटुंबांना हजारो झाडांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे येणार्या भविष्यकाळात पंढरपूर शहर हे हरित क्रांती म्हणून ओळखले जाईल.
कोरोना महामारी मानवाला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ -